Saturday, May 14, 2011

LOVE IS FOREVER........!!!!!!!!!!!!!!!





















































































Regards,

shripal s khadas

Friday, August 13, 2010

कुणीतरी हव आपल म्हननार ,

कुणीतरी हव आपल म्हननार ,
आपल म्हणुन हितगुज साधणार ,मायेच्या हळव्या बंधनात बांधून ठेवणार ,
बांधून ठेवताना कधीही न सुटणार ,प्रेमाच्या आशेपोटी आपल्याशी जवलिक साधणार ,
जवळ करून कधीही दूर न लोटनार ,

सुखाच्या क्षणात सुख वाटुन घेणार ,
अन त्या सुखात रंग भरणार ,

विरहाच्या क्षणात आपलस करणार ,
अन मायेने जवळ घेवून कुरवाळनार ,

चेहरयावर उमटना-या भावनांच कोड सोडवणार,
अन त्याच कोडयावर समजूत घालणार ,

कुणीतरी हव आपल म्हननार ,
आपल म्हणुन हितगुज साधणार…

असही प्रेम असत….

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

खरच विचारायचय तुला…

भरपूर मित्र – मैत्रिणी असतील तुला
पण त्यात मी खास आहे का??
हे विचारायचय तुला….सर्वांशी खुप काही share करत असशील
पण त्यात काही खास
माझ्याशी share करतोस का??
हे विचारायचय तुला…

सर्वाना तू असाच सतावतोस
की फ़क्त मला सतावतोस???
हे विचारायचय तुला…

तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणी च्या
रांगेत मी कुठवर आली आहे???
हे विचारायचय तुला…

तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगते
पण ती समजते का ??
हे विचारायचय तुला…

हे करताना मला सवय झालिये तुझी
पण तुला माझी सवय झाली आहे का???
हे विचारायचय तुला….

तुझ्या आयुष्यातील सुख- दू:खात
मी किती भागीदार आहे..आहे की नाही??
हे विचारायचय तुला…

इतक सार विचारल्यानंतर
आणखी एक विचारावस वाटतय..
”मी तुला सोडून गेले तर..कस वाटेल????”
खर तर हेच विचारायचय तुला…..

कळत – नकळत….

कळत – नकळत कस आयुष्य बनत ,
जीवनाच गणित डोळ्यांसमोर उलगडत ,आईची माया आठवताच मन भरून येत ,
खरच.. तिच्यासारख आपल्या कुणीही जवळच नसत ,

तिच्या सोबतीत जीवन स्वर्गापरी भासत ,
जस परिस लोखंडाला स्पर्श करत ,

शाळेत असताना मित्रांची सोबत असते ,
तिथे घडलेल्या सुख- दू:खाला त्यांच्या प्रेमाची झालर असते ,

त्यांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण मोलाचा असतो ,
कारन त्या क्षणाला समजुतपनाचा ओलावा असतो ,

तरुनाईच्या उम्बरठ्यावर पाउल ठेवताच कस पंख आल्यासारख वाटत ,
अन उडताना आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हव असत ,

प्रियकराच्या सोबतीत हायस वाटत ,
अन त्याचा विरह जीवनात पडलेल विरझन वाटत ,

तरीही सर्व विसरून सुखाने सुरुवात कराविशी वाटते ,
कारन मागे पडलेल्या पाउलखुना अनुभवाची शिदोरी देते ,

एखाद्या सायंकाळी निवांतपणे हे सर्व आठवत ,
अन जीवनाच्या गणितात काय बाकी राहिल हे कळत -नकळत समजुन जात..

एकदा वाटल…

एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव,
पण नंतर वाटल तुझ
तुला कळतय का ते पहाव,

जेव्हा तुझी आस असायची
तेव्हा तूच निराश करायचास,
अन जेव्हा आस मनी नसायची
तेव्हा सुद्धा तूच मनात ज्योत जागवायचास,

मनाच्या समुद्रात उठलेल्या
वादळला तूच प्रवृत्त करायचा,
तर कधी त्याच वादलाला
शांत सुद्धा तू करायचास,

आयुष्याच्या प्रत्येक वळनावर
साथ तुझी असावी,
दुरावलेल्या माझ्या भावनानी
सांगड़ तुझ्या हृदयाशी घालावी,

कधी हो तर कधी नाही
कधी आपुलकी तर कधी दुरावा,
गोंधळलेल्या मनाचा हात
मी तरी कसा धरावा,

म्हणून एकदा वाटल तुला सर्व
सांगुन मन मोकळ कराव…

संध्याकाळ..

आज संध्याकाळी फिरताना
पाहिले मी एका जोडप्याला ,
वयाची पन्नाशी ओलांडली
तरी अंत नव्हता त्यांच्या प्रेमाला ,

तळ्याच्या काठावर बसुनी
मन मोकले करत होती ,
खर तर त्या गप्पांमधुनी
एकमेकाना सावरत होती ,

आयुष्याच्या घालवलेल्या
क्षणांना आठवून हसत होती ,
खर सांगू का…
ती आजी अजुन ही
आजोबांना बघून लाजत होती ,

आजीला पाहून आजोबांनी
तिला मोगरयाचा गजरा भेट दिला ,
तळ्याच्या त्या काठावर बसून
एक ice-cream चा कोन
दोघांनी मिळून खाल्ला ,

प्रेमाच्या रंगात रंगताना
आजीच्या डोळ्यातून पाणी आले ,
अन तिने आजोबांचा हात हाती घेवुन
सात जन्माचे वचन पुन्हा मागितले ,

खर तर ती संध्याकाळ
माझ्यासाठी अविस्मरनीय होती ,
प्रेमाचे अजुन एक रूप
पाहण्याची मिळालेली अनमोल संधी होती ……..